न्यूयॉर्क : ऑडी या जगप्रसिद्ध कार कंपनीने नॉर्थ अमेरिकन इंटरनॅशनल ऑटो शो २०१७ मध्ये नवीन कार सादर केली. कंपनीने ऑडी A8 कॉन्सेप्ट कार सादर केलीये. यासोबतच कंपनीने फुल साईझ क्लास यूटिलीटी व्हेईकल रेंजमध्ये एन्ट्री केलीये.
ही कार पुढील वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये बाजारात दाखल होणार आहे.
या कारला कूपे आणि एसयूव्ही कारचं उत्तम मिश्रण मानलं जात आहे. ही कार ५.०२ मीटर उंच आहे. या कारचा व्हिलबेस ३ मीटर आहे. त्यामुळे लोकांसाठी आणि सामान ठेवण्यासाठी अधिकचा स्पेस मिळतो आहे. केवळ फ्रन्ट नाही तर बॅक सीटवर बसणा-यांना जास्त जागा मिळते. हेड स्पेस आणि शोल्डर स्पेस आरामदायक आहे.
कंट्रोलसाठी कारच्या व्हर्चुअल कॉकपिटमध्ये मोठा टचस्क्रीन लावण्यात आलाय. यासोबतच कॉन्टॅक्ट-अॅनालॉग हेड-अप डिस्प्ले सुद्धा देण्यात आलाय. या कारची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाहीये.