नवी दिल्ली : लग्जरी कार निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑडीने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षीत ऑडी Q5 लॉन्च केली आहे.
SUV सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या ऑडी Q5 साठी बाजारात आपलं वर्चस्व निर्माण करणं इतकं सोप राहणार नाहीये. कारण, या गाडीची स्पर्धा बीएमडब्ल्यू एक्स 3, मर्सिडीज बेंज जीएलसी, लेक्सस एनएक्स 300एच आणि वोल्वो एक्ससी 60 सारख्या SUV गाड्यांसोबत असणार आहे.
नव्या ऑडी Q5 मध्ये 2.0 लीटर डिझल इंजिन देण्यात आलं आहे जे 190PS ची पावर आणि 400NM चं टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 7 स्पीड ड्यूअल-क्लच गियरबॉक्ससोबत देण्यात आलेलं आहे.
ऑडी Q5 चा टॉप स्पीड 218kmph असून 0 ते 100kmphचा वेग पकडण्यासाठी गाडीला केवळ 7.1 सेकंदांचा अवधी लागतो. ही गाडी एका लीटरमध्ये 17.01 km चा मायलेज देते.
नव्या ऑडी Q5 मध्ये आधीच्या ऑडी Q5 पेक्षा जास्त बदल करण्यात आलेले नाहीयेत. नव्या ऑडी Q5मध्ये दोन्ही बाजूला एलईडी हेडलॅम्प्स आणि पुढील बाजुला हेक्सागनल ग्रिल देण्यात आली आहे. नवी ऑडी Q5 ही थोडी लांब आणि रुंदही आहे. या गाडीत 7 इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रिन, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग युनिट सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
या कारची एक्स शो रुम किंमत ५३.२५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.