असुसने लॉन्च केले ३ जबरदस्त स्मार्टफोन्स

स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, तैवानमधील दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असलेल्या असुसने आपले तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 15, 2017, 11:41 AM IST
असुसने लॉन्च केले ३ जबरदस्त स्मार्टफोन्स title=
File Photo

मुंबई : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, तैवानमधील दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असलेल्या असुसने आपले तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

असुसने 'झेनफोन ४ सीरिज'चे तीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण सहा स्मार्टफोन्स ताइपेमध्ये लॉन्च केले होते. ज्यामध्ये 'झेनफोन ४', 'झेनफोन ४ प्रो', 'झेनफोन मॅक्स', 'झेनफोन ४ मॅक्स प्रो' आणि 'झेनफोन ४ सेल्फी' या फोन्सचा समावेश होता.

मात्र, भारतीय बाजारपेठेत यापैकी केवळ तीनच फोन्स लॉन्च करण्यात आले आहेत. हे फोन २१ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

'झेनफोन ४ सेल्फी प्रो' फोनचे फिचर्स आणि किंमत

'झेनफोन ४ सेल्फी प्रो' फोन भारतीय बाजारपेठेत २३,९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये २४ मेगापिक्सेलचा ड्यूअल पिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सोनीचा आयएमएक्स ३६२ ड्युअल पिक्सेल इमेज सेंसर असून त्याचं अॅपेरचर एफ/१.८ आहे. तसेच प्रायमरी कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा आहे. या फोनमध्ये २ गिगाहर्ट्जचा ऑक्टाकोअर क्वैलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसरसोबतच ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी ३००० एमएएचची असून स्क्रीन ५.५ इंचाची आहे.

'झेनफोन ४ सेल्फी' ड्युअल कॅमेरा वर्जन फोनचे फिचर्स आणि किंमत

'झेनफोन ४ सेल्फी' ड्युअल कॅमेरा वर्जन असलेल्या या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये एक २० मेगापिक्सल आणि दुसरा ८ मेगापिक्सेलचा आहे. फोनची स्क्रिन ५.५ इंचाची आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. या फोनची बॅटरी ३,००० एमएएचची देण्यात आली आहे. 

'झेनफोन ४ सेल्फी' फोनचे फिचर्स आणि किंमत

'झेनफोन ४ सेल्फी' हा स्मार्टफोन भारतीय बाजारात ९,९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ५.५ इंचाची स्क्रिन देण्यात आली असून ३जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.