अॅपलचा नवा धमाका, आयओएस ११ उपलब्ध

अॅपल नवा धमाका करण्यास सज्ज झालेय. आयफोन आणि आयपॅडवर आयओएस ११ उपलब्ध होणार आहे. नव्या आयओएससोबत अॅपलने होमपॉड नावाची नवीन संयंत्रही बाजारात आणली आहेत.

AP | Updated: Jun 6, 2017, 08:35 AM IST
अॅपलचा नवा धमाका, आयओएस ११ उपलब्ध title=

वॉशिंग्टन : अॅपल नवा धमाका करण्यास सज्ज झालेय. आयफोन आणि आयपॅडवर आयओएस ११ उपलब्ध होणार आहे. नव्या आयओएससोबत अॅपलने होमपॉड नावाची नवीन संयंत्रही बाजारात आणली आहेत.

कॅलिफोर्नियात भरलेल्या वर्ल्ड वाईड डेव्हेलपर कॉन्फरन्समध्ये सोमवारी अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी अग्युमेंटड रिअॅलॅटीची ही अनोखी दुनिया जगासमोर आणली. यंदाच्या कॉन्फरन्समध्ये अॅपलच्या आयओएस या ऑपरेटिंग सिंस्टमची अकरावी आवृत्ती जगसमोर आणली.

गूगलच्या गूगल असिसंटची स्पर्धा करण्यासाठी आयओएसच्या ११व्या आवृत्तीत पूरेपुर सुविधा देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसातच आयफोन आणि आयपॅडवर आयओएस ११ उपलब्ध होणार आहे. न

व्या आयओएससोबत अॅपलनं होमपॉड नावाची नवीन संयंत्रही बाजारात आणली आहेत. या संयत्रानं ग्राहकांना घरातल्या तापामानापासून तर म्युझिक सिस्टमपर्यंत सारं काही तोंडानं आज्ञा देऊन नियंत्रित करता येणार आहे.