मुंबई : एपल ही जगविख्यात मोबाईल कंपनी यंदाच्या वर्षी तीन नवे आयफोन यंदा बाजारात आणणार आहे. आयफोन ११, आयफोन ११ मॅक्स आणि आयफोन एक्सआर २ अशी या नव्या आयफोन्सची नावे आहेत. यापैकी 'आयफोन एक्सआर २' तीन स्टोअरेज पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. त्यात तुलनेने स्लो इंटेल मॉडम असणार आहे. तर, 'आयफोन ११' आणि '११ मॅक्स'साठी 'ए २२' मॉडल नंबर नोंदवण्यात आला असून हे सर्व फोन तीन स्टोरेज पर्यायासह उपलब्ध असणार आहे.
एकाच वेळी तीन नवीन आयफोन येणार असल्यामुळे ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. सध्या तरी कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र या नव्या आयफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
याआधी गेल्यावर्षी दमदार फिचर्स आणि किंमतीसह एपलचे 3 नवे फोन आयफोनने आणले होते. आयफोन 10 आर, आयफोन 10 एस आणि आयफोन 10 एस मॅक्स यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाला. हे फोन 76 हजार 900 रुपयांपासून ते 1 लाख 44 हजार 900 पर्यंत आयफोनच्या किंमतीत उपलब्ध आहेत. 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि ड्युएल सिम अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे फोन मोबाईलप्रेमींना भुरळ पाडणारे ठरले. आता नवे आयफोन्स काय कमाल करतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.