फ्लीपकार्टवर आलायं आयफोन..२२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग

 २२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग होणार असल्याचे बोलले जात आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 17, 2017, 09:13 PM IST
फ्लीपकार्टवर आलायं आयफोन..२२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग title=

मुंबई : भारतात आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसची प्रीबुकिंग या महिन्यात सुरू होणार आहे. अॅपलने अधिकृतरीत्या ही बातमी सध्या जाहीर केली नसली तरी काही वितरकांनी यासंबधीचा गौप्यस्फोट केला आहे. २२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग होणार असल्याचे बोलले जात आहे. असेही सांगतिले जाते की, फ्लिपकार्टवर २२ सप्टेंबरपासून या दोन्ही स्मार्टफोनसाठी प्रीबुकिंग करता येणार आहे. 

आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरील लिस्टमध्ये दिसत आहेत. याची प्री ऑर्डर मध्यरात्री १२ वाजल्या पासून सुरू होणार आहे. या यादीनुसार आयफोन ८ स्पेस ग्रे,  गोल्ड आणि सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये ६४ जीबी आणि २५६ जीबी स्टोअर मेमरी असणार आहे. आयफोन ८ प्लसदेखील याच फिचर्ससह प्रीबुकींगसाठी उपलब्ध असणार आहे.