Smartphones स्वस्तात मस्त! 499 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' 8000 रुपयांचा फोन

Amazon Holi sale 2023 : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या सीझन सुरू असल्याने ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर एका पाठोपाठ एक सेल येत आहेत.तुम्हाला हा रेडमी फोन Amazon वर अगदी कमी किंमतीत मिळेल. 

Updated: Mar 4, 2023, 03:45 PM IST
Smartphones स्वस्तात मस्त! 499 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' 8000 रुपयांचा फोन title=
Amazon Holi sale 2023 Smartphones

Amazon Holi sale 2023 :  होळी (Holi 2023) हा आनंदाचा सण आहे. त्याचबरोबर होळीच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) ने जबरदस्त सेलसह विक्री केली आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी भेटवस्तू घ्यायची असेल, तर तुम्हाला हा रेडमी फोन Amazon वर अगदी कमी किंमतीत विकत घेऊ शकता.

जर तुम्हाला बजेट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी Redmi 8A Dual हा चांगला पर्याय असू शकतो. या मोबाईलच्या संबंधित ऑफर्स असून हा फोन फक्त 499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.या ऑफर्स जाणून घेण्यापूर्वी या फोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Redmi 8A Dual चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 8A Dual मध्ये तुम्हाला 6.22-इंचाचा HD + डॉट नॉच डिस्प्ले मिळेल. ज्यामध्ये 1520 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 19:9 आस्पेक्ट रेशो आणि 2.5D वक्र ग्लास आहे. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 439 ऑक्टा कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी आहे.

वाचा:  रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 250 गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी 

Redmi 8A Dual चा कॅमेरा

तुम्हाला यात डुअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. ज्यामध्ये 13MP मुख्य कॅमेरा आणि 2MP दुय्यम कॅमेरा आहे. याशिवाय या फोनमध्ये 5000mAh लिथियम-पॉलिमर बॅटरी उपलब्ध आहे. तुम्हाला या डिव्हाइससाठी 1 वर्षाची वॉरंटी आणि बॅटरीसह इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची निर्माता वॉरंटी मिळते.

 या ऑफर्समध्ये फोन

हा फोन Amazon वर 7,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे.तरी पण तुम्ही 499 रुपयांना कसे खरेदी करू शकता? ई-कॉमर्स साइटवर या फोनवर 7,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्ही या ऑफरचा पुरेपूर वापर केला तर तुम्हाला हा फोन फक्त 499 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय, तुम्हाला EMI चा पर्याय मिळेल, जो तुम्ही वापरू शकता. यामध्ये तुम्हाला 382 रुपयांचा EMI पर्याय मिळेल.