मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी रोज वेगवेगळे प्लॅन घेऊन येत आहे. एअरटेलनंही जिओला टक्कर देण्यासाठी त्यांच्या प्रिपेड यूजर्ससाठी नवा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी दररोज एक जीबी डेटा मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना ३९९ रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे.
4G मोबाईल हँडसेटसाठीच हा प्लॅन असणार आहे. तसंच एअरटेलचा हा प्लॅन स्पेशल आणि कमर्शिअल ग्राहकांना लागू असणार नाही. ८४ जीबी इंटरनेटबरोबरच ग्राहरांना लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. सगळ्याच नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.