नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपला आणखीन एक नवा प्लान लाँच केला आहे.
एअरटेलच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना ३०० GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही असणार आहे.
या प्लानची वैधता वर्षभरासाठी असणार आहे. प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. प्लानची खास बाब म्हणजे यामध्ये ग्राहकांना ३०० GB डेटा मिळणार आहे. हा डेटा ग्राहक एका दिवसात वापरू शकतात किंवा वर्षभरही वापरु शकतात.
ज्यांना अधिक इंटरनेट डेटाची आवश्यकता लागते अशा ग्राहकांना लक्षात ठेवून एअरटेलने हा प्लान लाँच केला आहे. मात्र, या प्लानसाठी ग्राहकांना ३,९९९ रुपये द्यावे लागणार आहेत.
एअरटेल युजर्ससाठी हा प्लान ३३४ रुपयांमध्ये पडणार आहे. युजर्सला पहिल्या महिन्यात २५ जीबी डेटा खर्च करावा लागणार आहे. तर तो ग्राहक संपूर्ण वर्षभर डेटा वापरू शकतो.
यापूर्वी एअरटेलने ३४९ रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. ज्यामध्ये २८ दिवसांची वैधता होती. दर १.५ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. त्यासोबतच १०० एसएमएस सोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.
रिलायन्स जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लानपेक्षा एअरटेलचा प्लान खूपच स्वस्त आहे. जिओच्या प्लानमध्ये युजर्सला ७० दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा मिळते. तर, दररोज १ जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो.