घरच्या घरी बनवून घ्या Aadhaar Card, जाणून घ्या UIDAI चं नवीन फिचर

आधार केंद्र सोडा, आता घरातून करा Face आणि Eye ऑथेंटिकेशन

Updated: Jul 18, 2022, 09:36 PM IST
घरच्या घरी बनवून घ्या Aadhaar Card, जाणून घ्या UIDAI चं नवीन फिचर title=

मुंबई : आधारकार्ड हे देशभरात सर्वांत मोठं ओळखपत्र ठरलंय. तुम्ही देशभरात कुठेही जा तूम्हाला हेच ओळखपत्र विचारणार. सरकारी योजना, बॅंकेची, शाळांची कामे यासाठी आधारचं लागतं. मात्र याआधी तुम्ही आधार कार्ड काढण्यासाठी केंद्रांवर जायचातं. मात्र आता ते करायची गरज नाहीए.कारण आता घरीच तुम्हाला आधार कार्ड बनवता येणार आहे. कसं ते खाली जाणून घ्या.  

आधारकार्ड काढण्यासाठी तुम्हाला केंद्रावर जाण्याची गरज पडायची. मात्र आता ती गरज लागणार नाही.कारण आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार FaceRD असं नवीन फिचर लॉंच केले आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला घरातच आधारकार्ड काढता येणार आहे.  

UIDAI काय म्हणाले?
UIDAI RD अ‍ॅपद्वारे आधार फेस ऑथेंटिकेशन फीचरचा वापर केला जाऊ शकतो, असे ट्विटमध्ये सांगण्यात आले. हे अनेक आधार ऑथेंटिकेशन अ‍ॅप्ससाठी वापरले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की आधार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान UIDAI ने स्वतः विकसित केले आहे.

कसं वापराल?
तुम्हाला Google Play Store वरून आधार FaceRD डाउनलोड करावे लागेल. यानंतर, अ‍ॅपपवर सांगितलेल्या माहितीद्वारे एक -एक स्टेप पुढे जा. चेहरा ऑथेंटिकेशनसाठी तुमचा चेहरा प्रकाशात असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा चेहारा नीट दिसणे गरजेचे आहे. 

 FaceRD अ‍ॅपचा असाही वापर?
रिपोर्टनुसार, फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे अ‍ॅप आधार ऑथेंटिकेशनसाठी एखाद्या व्यक्तीचा चेहरा थेट कॅप्चर करते. रेशन वितरण (पीडीएस), कोविन लसीकरण अ‍ॅप, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कल्याण योजना यांसारख्या घटनेत संबंधित व्यक्तीचा या अ‍ॅप्सद्वारे चेहरा ऑथेंटिकेशन करून याचा वापर होऊ शकतो. 

लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, या अ‍ॅपसह, आधार कार्ड धारकाला यापुढे लोकेटर आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन चेहरा ऑथेंटिकेशन आणि फिंगरप्रिंट स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे याचा नागरीकांना मोठा फायदा होणार आहे.