पाहा, चीनी कलाकार भारतीय शास्त्रीय संगीत गातोय....

कोणत्याही चीनी व्यक्तीला एवढ्या सहज पद्धतीने शास्त्रीय संगीत गाताना तुम्ही यापूर्वी पाहिलं नसेल.

Updated: May 21, 2018, 12:10 PM IST

मुंबई : कोणत्याही चीनी व्यक्तीला एवढ्या सहज शास्त्रीय संगीत गाताना तुम्ही यापूर्वी पाहिलं नसेल. सोशल मीडियावरील नेटीझन्सना देखील या चीनी गायकाने मंत्रमुग्ध केलं आहे. हा चीनी शास्त्रीय गायक कोणतंही जुनं भारतीय गाणं गात नाहीय, तर तो कर्नाटकी संगीताचा राग शंकरभारनम गातोय. सर्वांना आपल्या व्हिडीओने आकर्षित करणारा या अवलियाचं नाव आहे, चाँग चिऊ सेन आहे, मलेशियात जन्मलेला हा चाँग तसा चीनी आहे. त्याला साई मदन मोहन कुमार नावानेही ओळखतात. कर्नाटकी संगीतकार डी के पट्टम्मल यांच्याकडे अनेक वर्षापासून ते संगीताचं शिक्षण घेत आहेत. संस्कृतमध्ये भजन शिकण्यापासून सेन यांनी सुरूवात केली होती.