मुंबई : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. तुम्ही अधिक स्मार्ट राहण्यासाठी काही Apps आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता. मात्र, असे असले तरी काही Apps तुमची डोकेदुखी वाढवू शकतात. ही आठ Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ती तात्काळ डिलीट करा, अन्यथा तुमचे बँक अकाऊंट खाली झाले समजा. कारण कोरोना काळात अनेक हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. अनेक मालवेअर, हॅकिंगद्वारे पैसे चोरी करत आहेत. त्यामुळे तुम्ही आताच सावध व्हा.
कोरोना काळात काही हॅकर्सकडून बँक खात्यावर डल्ला मारण्यात येत आहे. यासाठी तुमच्या स्मार्टफोनमधील काही Apps त्यांना मदत करीत आहेत. त्यामुळे तुम्ही आताच सावध व्हा. गूगलनेही अशा काही धोकादायक Apps च्या शोध लावला आहे. त्यामुळे तुम्ही क्षणाचा विचार न करता ही धोकादायक Apps मोबाईलमधून त्वरीत काढून टाका आणि निश्चिंत राहा.
जोकर मालवेअरने (Joker Malware) पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. क्विक हिल सिक्योरिटी लॅबच्या (quick heal security lab) रिसर्चर्सने गूगल प्ले स्टोरच्या (Google Play Store) अशा आठ Appचा शोध लावला आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये यापैकी कोणतेही अॅप असेल तर ते फोनमधून लगेच डिलीट करण्याची गरज आहे. जोकर मालवेअर Android डिव्हाईसला टार्गेट करतो. जोकर मालवेअर असा व्हायरस आहे, तो दर काही महिन्यांनी Google Play Store वर परत येण्याचा मार्ग शोधता आणि त्यात तो यशस्वी होतो.
हाती मिळालेल्या माहितीनुसार, जोकर मालवेअर ग्राहकाचा डेटा चोरी करतो, ज्यात SMS, कॉन्टॅक्ट लिस्ट, डिव्हाईस डिटेल, OTP सारखी माहिती आहे. Googleने ही अॅप Google Play Storeवरुन डिलीट केली आहेत. परंतु जर एखाद्या युजरने हे आधीच डाऊनलोड केले असेल, तर ते जोपर्यंत डिलीट केले जात नाहीत, तोपर्यंत फोनमध्येच असेल तर धोका जास्ता आहे. त्यामुळे फोनमधून ही अॅप डिलीट केली पाहिजेत.
- Auxiliary Message
- Fast Magic SMS
- Free CamScanner
- Super Message
- Element Scanner
- Go Messages
- Travel Wallpapers
- Super SMS
Google Play Storeवर जा. त्यानंतर स्मार्टफोनमध्ये असलेले मालवेअरवालं अॅप सर्च करा. त्यानंतर अॅप पेजवर Uninstall करा. असे केल्यानंतर तुमचे धोकादायक App फोमधून डिलीट होईल. तसेच होम स्क्रिनवर जाऊनही अॅपवर लाँग प्रेस करुन, ‘x’ आयकॉन मिळतो, तिथूनही डिलीट करू शकतात.