ऑनलाईन सेलपूर्वीच वन प्लस 5T फोनसाठी ११ लाखाहून अधिक रजिस्ट्रेशन

वन प्लस  आज वन प्लस 5T हा स्मार्टफोन आज भारतामध्ये लॉन्च करणार आहेत.

Updated: Nov 21, 2017, 09:11 AM IST
ऑनलाईन सेलपूर्वीच वन प्लस 5T फोनसाठी ११  लाखाहून अधिक रजिस्ट्रेशन  title=

मुंबई : वन प्लस  आज वन प्लस 5T हा स्मार्टफोन आज भारतामध्ये लॉन्च करणार आहेत.

अमेझॉनवर हा फोन  उपलब्ध होणार आहे. मात्र फ्लॅश सेल सुरू होण्याआधीच सुमारे ११ लाखाहून अधिक ग्राहकांनी या फोनसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे हा फोन बाजरात धुमाकूळ घालणार हे नक्की ! 

किंमत - 

६ जीबी आणि ६४ जीबी चा हा फोन ३२,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. 8GB RAM/128GB स्टोरेज असणारा फोन ३७,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. २१ नोव्हेंबर रोजी अमेझॉनवर प्राईम मेंबर्ससाठी सेल सउरू होईल. तर २८ नोव्हेंबरपासून इतरांसाठी सेल सुरू होणार आहे.  

विशेष काय ?  

वन प्लस 5T मध्ये फेस अनलॉकसारखे हायटेक फीचर्स आहेत. मात्र तरीही त्याची किंमत वन प्लस इतकी आहे.  त्यामुळेच सेल सुरू होण्याआधी सुमारे ११ लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. स्वस्तात उपलब्ध असणार्‍या या फोनमध्ये अधिक फीचर्स उपलब्ध असल्याने अधिक ग्राहक या फोनसाठी उत्सुक आहेत. 

वन प्लस 5T ची फीचर्स 

क्वॉलकॉम स्नैपड्रेगन चा  835 प्रोसेसर
 8GB रॅम  
 6.01-inch चा  फुल एचडी डिस्प्ले
रेजोल्यूशन (1080x2160 pixels) 
ब्राईट फोटोंसाठी उत्तम कॅमेरा