तुम्ही चुकूनही 'असे' Password ठेऊ नका, अकाउंट एका सेकंदात होईल हॅक

Weak passwords list: लोक सामान्य पासवर्ड लक्षात ठेवतात. त्यापैकी काही पासवर्ड असे आहेत की हॅकर्स 1 सेकंदात क्रॅक करू शकतात. पाहूया संपूर्ण यादी...

Updated: Oct 3, 2022, 01:04 PM IST
तुम्ही चुकूनही 'असे' Password ठेऊ नका, अकाउंट एका सेकंदात होईल हॅक  title=

Top 10 Weak Passwords: स्मार्टफोन, ई-मेल आणि सोशल मीडियासोबत इंटरनेट बँकिंगसाठी पासवर्डचा (password) वापर केलाच जातो. सर्वात कठीण पासवर्ड असणे आणि लक्षात ठेवणे ही सर्वात मोठी समस्या आहे. अनेक वेळा लोक लक्षात ठेवण्यासाठी सामान्य पासवर्ड ठेवतात. (10 passwords are the weakest anyone will hack in 1 second)

बँक, सोशल मीडिया आणि पेमेंट अॅप्स यांसारख्या ऑनलाइन अॅप्समध्ये लोक सामान्य पासवर्ड ठेवतात. पण लक्षात ठेवा  तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी सोप असणारा पासवर्ड म्हणजे हॅकरसाठी काही सेकंदात तो क्रॅक करणारा पासवर्ड ठरू शकतो.  

याबाबत एका सिक्योरिटी फर्मने म्हणजेच NordPass ने धोकादायक पासवर्डची लिस्ट जारी केली आहे. ज्यात असे उघड झाले आहे की, कमकुवत पासवर्डच्या वापरामुळे लाखो इंटरनेट वापरकर्त्यांचे ऑनलाइन खाते हॅक होण्याचा धोका आहे. यातील काही इतके कमकुवत आहेत की ते फक्त एका सेकंदात क्रॅक होऊ शकतात.

मोठ्या संख्येने लोक '123456', 'qwerty' आणि अगदी 'पासवर्ड' सारखे पासवर्ड वापरत आहेत जे क्रॅक होण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही यापैकी कोणतेही सामान्य पासवर्ड वापरत असाल तर तुम्ही ते आता बदलले पाहिजेत. जाणून घ्या डिटेल्स...

हे 10 सर्वात सामान्य पासवर्ड 

123456
123456789
12345
qwerty
password
12345678
111111
123123
1234567890
1234567

वाचा : Debit Card मध्ये Zero Balance असला तरी तुम्ही खरेदी करू शकता, कसं ते पाहा  

केवळ हे अंकीय पासवर्डच नाही तर नॉर्डपासच्या संशोधनात असेही दिसून आले आहे की, लोक त्यांचे नाव कोड म्हणून वापरतात तसेच त्यांचा पासवर्ड म्हणून अपशब्द वापरतात. 'डॉल्फिन' हा शब्द अनेक देशांमध्ये प्राण्यांच्या पासवर्डमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. NordPass क्रॅक करणे कठीण असलेल्या संयोजनाचा वापर करण्यासाठी स्विच करण्याचा सल्ला देते.

पासवर्ड मजबूत कसा बनवायचा

1 . पासवर्डमध्ये अप्पर आणि लोअरकेस अक्षरे, संख्या आणि चिन्हांचे विविध संयोजन असणे आवश्यक आहे.
3. तसेच, तुमच्याकडे वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड असल्याची खात्री करा.
४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर 90 दिवसांनी तुमचे पासवर्ड बदलत राहा.