soniya gandhi

निवडणुका कधीही, तयार रहा - सोनिया गांधी

कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयार रहावं अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलीये. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत त्यांनी हे सूचक वक्तव्य केलंय.

Mar 19, 2013, 01:05 PM IST

शरद पवारांचा काँग्रेसवर रूसवा कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार पु्न्हा नाराज झाले आहेत. हे त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत आहे. याआधी नंबर दोनवरून धुसफुस झालेल्या पवारांनी राजीनाम्याची तयारी चालविली होती. त्याबाबत मीडियात खूप चर्चा झाली. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले होते. आता तर त्यांनी चहापानाला अनुपस्थिती दर्शवली.

Jul 23, 2012, 12:33 PM IST

अशोक चव्हाण समर्थकांची धाव प्रभारीपर्यंत

माजी मुख्यमंत्री आणि आदर्श घोट्याळ्यात आरोप ठेवण्यात आलेले अशोक चव्हाण यांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या अशोक चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारलीय. त्यामुळं आता चव्हाण समर्थक आमदार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.

Jul 11, 2012, 06:38 PM IST

सोनिया गांधी सांगणार तेच राष्ट्रपती

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आलेत. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 4, 2012, 07:59 PM IST

सगळ्यांचा बरोबर हिशोब होणार- सोनिया गांधी

देशातल्या विधानसभा निवडणुकीतल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत सोनियांनी नेत्य़ांना खडे बोल सुनावले.

May 9, 2012, 02:18 PM IST

युपीएच्या मानगुटीवर युपीचं भूत..

भलतचं धाडस राहुलबाबांच्या अंगाशी आलं आणि युपीत काँग्रेसला तोंडघशी पडावं लागलं. गरिबांचा कळवळा असल्याचं दाखवणा-या राहुलबाबांना युपीतल्या जनतेनं नाकारलं उलटं टॅब्लेटची स्वप्न दाखवणा-या आणि शेतक-यांना सोबत घेणारा अखिलेश त्यांना जवळचा वाटला. पण अपयशाची जबाबदारी स्विकारणा-या राहुल बाबांचा उदोउदो करणा-यांना वेळीच लगाम घालून चुकांमधून शिकणं काँग्रेससाठी अत्यावश्यक आहे नाहीतर मग युपी पॅटर्नची पुनरावृत्ती होणार आहे.

Mar 7, 2012, 10:31 PM IST

'देवानंद एक महान अभिनेता'- पंतप्रधान

ज्येष्ठ अभिनेता आणि प्रसिद्ध कलाकार देवानंद याचं हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झालं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंह आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या निधनामुळे तीव्र शोक व्यक्त केला.

Dec 4, 2011, 08:25 AM IST