sena

युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा

शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी  उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे.

Sep 22, 2014, 11:29 AM IST

सिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे

कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.

Apr 16, 2014, 09:17 AM IST

नरे पार्क मैदान बचाव : शिवसेना-मनसे आमने सामने

मुंबईतल्या परळमधलं नरे पार्क मैदान बचावासाठी शिवसेना सरसावली आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मैदानावर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याबरोबरच स्विमिंग पूल, जॉगिंग पार्क, क्लबचं बांधकाम करण्याची योजना मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी आणली आहे.

Oct 9, 2013, 01:11 PM IST

अजित पवारांनी तोंड उघडले आणि मीडियाला हात जोडले!

ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वादग्रस्त विधानाने अचणीत आले होते. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मी जपून विधान करीन असे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी तोंड उघडले. त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. तर दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क मीडिया चांगली बातमी दाखविण्याचं आवाहन करताना चक्क हात जोडलेत.

Jun 13, 2013, 06:44 PM IST

पंतप्रधान उमेदवारीवरुन शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जेडीयु आणि भाजपमध्ये बिनसलं असतानाच, शिवसेनेनंही यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.

Apr 17, 2013, 03:24 PM IST

राष्ट्रवादीला नवी मुंबईत ‘दे धक्का’

राष्ट्रवादीला दणका देत शिवसेनेच्या नगरसवेकांने नवी मुंबई महापालिकेत प्रवेश केला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. ५४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार विठ्ठल मोरे यांनी विजय मिळवत पालकमंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक या राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘दे धक्का’ दिलाय.

Apr 9, 2013, 12:13 PM IST

`मनसे-शिवसेनेची मान्यता का रद्द करू नये?`

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या राजकीय पक्षांचा आक्रमकपणा त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाला आहे. या दोन्ही राजकीय पक्षांची मान्यता का रद्द करू नये, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

Jan 8, 2013, 11:33 AM IST