पालिका निवडणूक : घराणेशाहीचा विजय; ७ दाम्पत्य, २ पिता-पुत्र विजयी
महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय. यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे.
Apr 23, 2015, 11:04 PM ISTभाजपचे किसन कथोरे यांच्या गडात सेनेचा भगवा
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेनं सत्ता काबिज केलीय. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत भाजपने विशेषतः आमदार किसन कथोरे यांनी प्रतिष्ठेची लढत केली होती.
Apr 23, 2015, 10:44 PM IST२१ ग्रामपंचायतीसह गडचिरोलीत मतदान
अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह दक्षिण गडचिरोलीत २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथके व पोलिस बंदोबस्त तैनाता करण्यात आला आहे.
Apr 23, 2015, 10:22 PM ISTगणेश नाईक यांची २० वर्षांपासून एकहाती सत्ता
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.
Apr 23, 2015, 07:58 PM IST#रणसंग्राम : नवी मुंबईत नणंदेने भावजयला केले पराभूत
महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणेश नाईक कुटुंबातील नणंद भावजय यांच्या लढतीत अखेर नणंद वैशाली म्हात्रे हिने विजय मिळवला.
Apr 23, 2015, 04:44 PM IST#रणसंग्राम : अंबरनाथमध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले
नगरपरिषदेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वॉर्ड क्रमांक ३९मध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले आहे. या वॉर्डात दोन्ही अपक्ष उमेदावाराने जोरदार टक्कर दिली. अपक्ष उमेदवारांना समसमान मते पडलीत.
Apr 23, 2015, 03:42 PM IST