कहाणी कुसुमाग्रजांची
श्री. शं. सराफ
गजानन इंग्रजी चौथीत, म्हणजे आताच्या आठवीत शिकत होता. वर्गात मराठीच्या शिक्षकांनी लोकमान्य टिळकांवर निबंध लिहावयास सांगितला. शिक्षकांना निबंध आवडल्याने त्यांनी गजाननची पाठ थोपटली. त्या नशेतच तो घरी आला. समोर नाशिकच्या साप्ताहिक ‘लोकसत्ता’चा अंक दिसला.