पॅन कार्ड नसेल तर बॅंकेतील पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत!
मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर ज्यांकडे या नोटा आहेत, त्यांना बॅंकेत जमा करण्याची मुदत आता ३० डिसेंबरपर्यंत आहे. तुम्ही बॅंकेत लाखो रुपये जमा केले असतील तर यापुढे ते पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्ही बॅंकेतील तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने स्पष्ट केलेय.
Dec 16, 2016, 10:00 PM IST