ncp and mns

राष्ट्रवादीने नाक खुपसू- मनसे

मनसेनं कुणासोबत युती करावी हे राष्ट्रवादी नेत्यांनी सांगू नये अशा शब्दांत मनसे आमदार बाळा नांदगांवकर यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत मनसेनं शिवसेनेच्या पारड्यात मतं टाकली होती.

May 30, 2012, 05:20 PM IST

मनसेची राष्ट्रवादीला साथ, सेनेवर करणार मात

ठाणे झेडपीतही मनसेनं शिवसेनेला दणका दिला आहे. त्यामुळं ठाणे झेडपीत राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे. ६६ सदस्यांच्या झेडपीत बहुमतासाठी ३४ सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीकडं २७ सदस्य आहेत. तर काँग्रेसचा एक आणि मनसेचे दोन असे ३० सदस्यसंख्या होते.

Mar 20, 2012, 11:46 AM IST

मनसेला नाही मत, सेनेला मोजावी लागणार किंमत!

नाशिकमध्ये मनसेला अपशकून करू पाहणा-या शिवसेनेला त्याची किंमत आता ठाण्यात चुकवावी लागतेय.... शिवसेनेच्या नाशिकमधील भूमिकेनं संतप्त झालेल्या मनसेनं ठाण्यातला ठाकरे पॅटर्न मोडीत काढून युतीऐवजी आघाडीला पाठिंबा दिलाय.

Mar 19, 2012, 07:42 PM IST

हा तर सेनेचा रडीचा डाव – जितेंद्र आव्हाड

शिवसेनेनं रडीचा डाव खेळत ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, असा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कोकण भवनातून पाठिंब्याबाबतचं पत्र न मिळाल्यामुळं महापौरांनी निवडणूक पुढे ढकललीय.

Mar 19, 2012, 07:41 PM IST

मनसेची साथ, NCPचा महापौरपदाचा घास?

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौरपदाचा ताबा घेतला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर साळवी महापौरांच्या खुर्चीत बसले. तर हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेतेपदी निवड केली आहे.

Mar 19, 2012, 05:49 PM IST