nagaraj poptrao manjule new movie

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे घेऊन येत आहेत 'नाळ भाग २'

'नाळ'च्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा घेऊन येत आहेत 'नाळ भाग २'. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाची प्रेक्षकांशी 'नाळ' जोडली गेली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपले नाव कोरले. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाने दिवाळीतही चित्रपटगृहात 'हाउसफुल्ल'चे बोर्ड झळकवले. चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या.

Oct 6, 2023, 06:18 PM IST