वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?
Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.
Jul 1, 2023, 04:51 PM ISTवंदे भारत प्रवास : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा
Mumbai Goa Vande Bharat Express Ticket Fair: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. (Vande Bharat train on Konkan Railway) दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर किती असणार याची उत्सुकता होती. आता हे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.
Jun 29, 2023, 10:31 AM ISTकोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास
Mumbai to Goa Vande Bharat Express: मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे.
May 16, 2023, 11:01 AM IST