मुंबई । ३६ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Sep 4, 2019, 02:35 PM ISTमुंबई । मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Sep 4, 2019, 02:30 PM ISTजुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, हवामान विभागाचा नवा अंदाज
राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी काही ठिकाणीच पाऊस झाला. संपूर्ण राज्यात पाऊस झालेला नाही.
Jun 27, 2019, 10:55 AM ISTमुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM IST