malaysia airlines

बेपत्ता मलेशिया विमानाचा आता अंदमान सागरात शोध सुरू

बेपत्ता मलेशिया विमानाचं गूढ आणखी वाढत चाललंय. संपर्क तुटण्यापूर्वी बहुतेक विमानानं आपली दिशा बदलली होती, ते पुन्हा परतीकडे वळलं होतं. आता बेपत्ता विमानाच्या तपासाचं अभियान अंदमान सागरात सुरू आहे. शेकडो किलोमीटर समुद्रात याचा शोध आतापर्यंत घेण्यात आलाय.

Mar 12, 2014, 02:35 PM IST

बेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये - मलेशिया सैन्य

बेपत्ता मलेशिया विमानाच्या शोध घेण्यात यश आलंय. मलेशिया सैन्याच्या मते त्यांच्या रडारवर बेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये असल्याचे संकेत मिळालेत. मलक्का जलडमरुममध्ये त्या ठिकाणापासून खूप दूर आहे. जिथं विमानानं संपर्क साधला होता.

Mar 11, 2014, 05:40 PM IST

बेपत्ता विमान शोधण्यासाठी १० उपग्रह कामाला

अचानक बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचं गूढ वाढतच चाललंय. आज चौथा दिवस उजाडला असला तरी या विमानाचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे या विमानाला शोधण्यासाठी चीननं तीव्र मोहीम सुरू केलीये.

Mar 11, 2014, 11:59 AM IST

मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळले

मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला आहे. तर व्हिएतनामच्या सरकारी मीडियाने हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे २३९ प्रवाशी आणि १२ कर्मचाऱ्यांबाबत भिती व्यक्त करण्यात आली आहे.

Mar 8, 2014, 12:05 PM IST

मलेशियाचे विमान बेपत्ता, विमानात २३९ प्रवाशी

मलेशिया एअरलाइन्सचं विमान अचानक बेपत्ता झाले आहे. या विमानाची माहिती रडारावरून मिळत नसल्याने अपघाताची भिती व्यक्त होत आहे. या विमानात २३९ प्रवासी आणि १२ कर्मचारी आहेत. या विमानाच शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. २०० कर्मचारी मदतकार्य करीत आहेत.

Mar 8, 2014, 11:06 AM IST