kokan

कोकणातील डबलडेकर कोणासाठी असा?

कोकणातल्या गणेशोत्सवासाठी सुरु झालेली एसी डबल डेकर ट्रेनचा उपयोग काय, ती कोणासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Aug 26, 2014, 08:07 PM IST

सावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता

पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.   

Aug 1, 2014, 09:10 PM IST

मुंबई आणि उपनगरांत धो-धो पाऊस

मुंबई आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, परळ आणि सीएसटीतही जोरदार पाऊस सुरू आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस आणि जेजे फ्लाय ओव्हरवर वाहनांची कोंडी झाली आहे. 

Jul 31, 2014, 07:02 PM IST

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पाली, पेण, खालापूर, कर्जत, नागोठणे अलिबाग या भागात पावसाची संततधार सुरूच आहे. 

Jul 28, 2014, 01:20 PM IST

स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू

स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा कोकणात रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड इथं हा अपघात झालाय.

Jul 20, 2014, 07:08 PM IST

कोकणात पाचव्या दिवशाही मुसळधार

रत्नागिरीत सलग पाचव्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.

Jul 14, 2014, 12:14 AM IST

रिझर्व्हेशन सुरू होताच हाऊसफुल्ल, दलालांचा फटका

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर दलालांचं विघ्न दूर करण्याचं आव्हान आहे. काल या गाड्यांसाठी आरक्षण सुरु झालं आणि अवघ्या काही मिनिटातचं हाऊसफुल्ल झालं. त्यामुळं रात्रभर तिकीटांसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केलीय.

Jun 30, 2014, 08:41 AM IST