independence day special

तिरंग्याचा अपमान कराल तो भोगावी लागेल 'ही' शिक्षा

Independence Day 2024: तिरंग्याचा अपमान कराल तो भोगावी लागेल 'ही' शिक्षा. 15 ऑगस्टला देशात स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो.यावर्षी भारत 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.पण 15 ऑगस्टनंतर अनेक ठिकाणी विदारक चित्र दिसतं.आपल्या देशाचा तिरंगा रस्त्यांवर फेकलेला दिसतो.तिरंग्याचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.पण तिरंग्याचा अपमान करणाऱ्याला काय शिक्षा मिळते?हा भारतीय ध्वज संहिता 2021 आणि राष्ट्रीय गौरवाचा अपमान मानला जातो.यात दोषी आढळल्यास कलम 1971 नुसार 3 वर्षाची शिक्षा किंवा दंड ठोठावला जातो.नव्या नियमांनुसार तिरंगा 24 तास फडकावला जाऊ शकतो. 

Aug 5, 2024, 03:16 PM IST

भारतातील 'असं' एकमेव ठिकाणं जिथे मिळतो अधिकृत तिरंगा

 आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी याची तयारीदेखील सुरु झालीय. आज आपण तिरंग्यासंदर्भातील काही गोष्टी जाणून घेऊया.भारतीय तिरंगा केवळ एका जागीच बनवला जातो.कर्नाटकच्या हुबळी शहरातील बेंगेरी भागातील KKGSS मध्ये बनतो. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून याला मान्यता आहे. या यूनिटला हुबळी यूनिट म्हटले जाते. KKGSS ची स्थापना 1957 मध्ये झाली. 2004-2006 पासून त्यांनी तिरंगा बनवायला सुरुवात केली. लाल किल्ल्यापासून जिथे कुठे तिरंग्याचा अधिकृत वापर होतो.त्यांना KKGSS कडून तिरंगा पुरवला जातो. 

Aug 2, 2024, 04:13 PM IST

झाशीची राणी, वारकरी की आणखी काही? स्वातंत्र्यदिनी मुलांना तयार करण्यासाठी Dressing Ideas

जवळपास 200 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीचा सामना केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी शाळांमध्ये बरीच तयारी केली जाते आणि मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं आयेजन केलं जातं.  मुलांसाठी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा हा एक अभिमानाचा क्षण असतो. जेव्हा हे चिमुकले छान नटून थटून शाळेत जातात.  कधी कोणी झाशीची राणी होतं. तर कधी कोणी वारकरी होतं. तर कधी कोणी साऊथचा अण्णा बनतो. यावेळी जर तुम्ही सुद्धा याच विचारात असाल की, आपण आपल्या मुलासाठी कोणती वेषभूषा निवडायची तर हे फोटो नक्की एकदा पाहाच.  तुम्ही तुमच्या मुलांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त ही वेशभूषा निवडू शकता.

Aug 14, 2023, 07:05 PM IST

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर मोदींनी तोडला प्रोटॉकॉल

71 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरेनुसार राजधानी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्यावरून देशाला उदे्देशून भाषण केले. मात्र, हे भाषण करत असताना मोदींनी प्रोटोकॉलचा भंग केला. 

Aug 15, 2017, 10:38 PM IST