fund non

'निधीअभावी राज्यात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी रखडल्याची कबुली '

निधीअभावी राज्यात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी रखडल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिली.  या योजनेअंतर्गत राज्यातल्या एक कोटी सत्तर लाख कुटुंबियांना गहू आणि तांदूळ दिलं जात नाही आणि सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रॉकेल कोट्यात कपात केल्याचा प्रश्न विचारण्यात आला.  त्यावर उत्तर देताना धान्य आणि रॉकेल निधी अभावी दिले जात नसल्याचं बापटांनी मान्य केलं. 

Mar 12, 2015, 11:10 PM IST