diwali celebration

दिवाळीमध्ये फटाके उडवणे चिमुरडीच्या जीवावर बेतलं

दिवाळीमध्ये फटाके उडवणे एका चिमुरडीच्या जीवावर बेतलंय. नवी मुंबईत ही घटना घडलीये. फटाके फोडताना अंकीता किकाराम चौधरी या 8 वर्षीय मुलीच्या कपड्यांनी पेट घेतला.  गंभीररीत्या भाजून अंकीताचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कळंबोली सेक्टर-16 मध्ये घडली. 

Nov 3, 2016, 05:46 PM IST

दिवाळीनिमित्त रोषणाईने सजली दुबई

 दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि रोषणाईचा सण. दिवाळीत सगळीकडे पहायला मिळते ती रोषणाई. घर लाईटिंग्स, कंदिल, दिवे यांनी सजवलं जातं. भारतात तर दिवाळी साजरी होतेच पण जे भारतीय परदेशात राहतात ते देखील परदेशात दिवाली साजरी करतात. दुबईमध्ये देखील याची एक झलक पाहायला मिळाली. दिवाळी निमित्त दुबई देखील रोषणाईने चमकून दिसत होती.

Oct 30, 2016, 01:49 PM IST

दिवाळीचं ‘सेलिब्रेशन’ म्हणजे नेमकं काय हो...?

निवडणुकीच्या धामधुमीत दिवाळीची धामधून थोडी मागे पडलीय... पण, एव्हाना आपण ज्या सणाची वर्षभर वाट पाहत असतो... तो सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. 

Oct 16, 2014, 01:02 PM IST

पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी!

अमेरिकेच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कॅपिटॉल हिल्सवर यंदा प्रथमच दिवाळीची आतषबाजी बघायला मिळाली. याबाबत अमेरिकन सिनेट आणि काँग्रेसमध्ये द्विपक्षीय ठराव एकमतानं संमत केल्या नंतर कॅपिटॉल हिल इथं पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम झाला.

Oct 31, 2013, 03:53 PM IST

बिग बीच्या घरी दिवाळीला २०० कंदील

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदाची दिवाळी मोठी असणार आहे. यासाठी बच्चन यांनी ठाण्यातल्या कैलास देसले यांच्याकडं २०० आकाश कंदीलांची ऑर्डर नोंदवलीय. इको फ्रेंडली कंदील बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Nov 8, 2012, 04:57 PM IST