debt remission

कर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ

विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.

Mar 17, 2017, 03:55 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Mar 17, 2016, 04:04 PM IST