cwg 2014

कॉमनवेल्थ : भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध धडाका कायम , 25 मेडल

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध घेण्याचा धडाका कायम आहे. 50 मीटर पिस्तल प्रकारात भारताने गोल्ड आणि सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. जितू रायने 194.1 पॉईंट्स कमाई तर केलीच याचबरोबर नव्या कॉमनवेल्थ रेकॉर्डसची नोंदही केली. याखेरीज गुरपाल सिंगने सिल्व्हर मेडलवर नाव कोरत शुटींगमधील भारताचा दबदबा कायम राखला. भारतीय प्लेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे भारताने 25 मेडल्स मिळवत टॅलीमध्येही चौथ्या स्थानी झेप घेतलीय.

Jul 29, 2014, 08:01 AM IST

सुवर्णपदक हातात घेऊन बिंद्राची कॉमनवेल्थमधून निवृत्ती

कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याचं हे अभिनव बिंद्रा याचं शेवटचं वर्ष ठरलंय. ‘10 मीटर एअर रायफल’च्या व्यक्तिगत स्पर्धेत बिंद्रानं सुवर्ण पदक पटकावलंय... यानंतर त्यानं आपण खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. 

Jul 26, 2014, 08:03 AM IST