आशियातील सर्वात मोठी चॉकलेट फॅक्ट्री भारतात! कुठे बनते डेअरी मिल्क, फाइव्ह स्टार?
भारतामध्ये सॅटलाइट शहरे तयार होतायत, त्यामध्ये आंध्र प्रदेशच्या श्री सिटीचा समावेश आहे.श्री सिटीमध्ये कॅडबरीमध्ये चॉकलेट बनवणारी कंपनी मोंडेलेजची मॅन्युफॅक्चरींग फॅक्ट्री आहे.मॉंडेलेजची फॅक्ट्री भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठी फॅक्ट्री आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, मोंडेलेजने 2016 मध्ये 1250 कोटी रुपयांत आपली फॅक्ट्री तयार केली होती. वर्षाला 2 लाख 50 हजार टन चॉकलेट्स बनवण्याची या फॅक्ट्रीची क्षमता आहे. या फॅक्ट्रीमध्ये डेअरी मिल्क, फाइव्ह स्टारसह 8 प्रकारचे चॉकलेट तयार केले जातात. मोंडेलेजच्या महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्येदेखील फॅक्ट्री आहेत. मोंडेलेज ही इंग्लंडची कंपनी असून त्याची सुरुवात 1824 मध्ये झाली.
Oct 25, 2024, 02:12 PM ISTका व्हायरल होतेय Cadbury Dairy Milk ची नवी जाहिरात?
जाहिरात हे विविध क्षेत्रांतील आणि स्तराती व्यक्तींना जोडण्याचं एक सुरेख माध्यम आहे. काळ बदलत गेला तसं हे जाहिरात क्षेत्रही बदलत गेलं. नव्या संकल्पनांना स्वीकारत नवा नजराणा या क्षेत्रानं कायमच सादर केला. सध्याही याचीच प्रचिती येत आहे. जिथं भारतामध्ये एखाद्या पंथाप्रमाणं महत्त्व असणार्या क्रिकेट या खेळाचा संदर्भ घेत कॅडबरी या चॉकलेट ब्रँडची जाहिरात साकारण्यात आली आहे.
Sep 21, 2021, 09:03 AM IST