bjp leaders

हिमाचलमध्ये शेवटच्या दिवशी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा जोरदार प्रचार

हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

Nov 7, 2017, 11:52 AM IST

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 11:09 AM IST

भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा

भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा देण्यात आला आहे. सत्तेत कुणीही वाटेकरी नको असं विधान भाजप नेते मधु चव्हाण यांनी केलं आहे. सारा महाराष्ट्र जिंकूया अर्धा नाही असंही चव्हाण यांनी म्हटलंय.

Jan 12, 2017, 03:14 PM IST

भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी

हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची जोरदार खडाजंगी झाली. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली.

Nov 15, 2016, 07:26 PM IST

स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांचे फोटो

कोर्ट परिसरात झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटाची चौकशी सुरु झाली आहे. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्या ठिकाणी एक पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्याचे फोटो आढळले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, यामध्ये खुलासा झाला आहे की देशात आणखी काहबी ठिकाणी अशाच प्रकारे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात.

Nov 3, 2016, 12:30 PM IST

भाजपच्या मराठा नेत्यांना मोर्चात सहभागी होण्यास सहमती

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोठमोठे मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमधे विविध पक्षाचे आणि संघटनांचे नेते खुलेआम सहभागी होत आहेत. 

Sep 19, 2016, 06:45 PM IST

भाजप नेत्यांनंतर आता शिवसेना नेते वादात

खुद्द राज्याचे ग्रुहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अतिक्रमण करुन घेतलेली जमीन अजूनही परत केली नसल्याचा आरोप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. या प्रकरणात गृहनिर्माण राज्यमंत्री वायकरांवर म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका कारवाई कशी करणार, असा सवालही यावेळी संजय निरुपम यांनी केला. 

Jun 23, 2016, 06:19 PM IST

राणेंनी विधानसभा लढवली, तर भाजपाचा शिवसेनेला पाठिंबा?

वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसने तिकीट दिलं, तर या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Mar 18, 2015, 06:21 PM IST

भाजपमध्ये कशासाठी होतेय चढाओढ....कोणी मारली बाजी?

नव्या भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये सध्या शासकीय बंगले आणि मंत्रालयातल्या दालनांच्या निवडीवरून स्पर्धा सुरू झालीय. रामटेक, देवगिरी, पर्णकुटी अशा काही अलिशान बंगल्यांसाठी अनेक मंत्र्यांनी फिल्डिंग लावलीय. शिवाय मंत्रालयातच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासाठी रस्सीखेच सुरू आहे.

Nov 6, 2014, 11:23 AM IST

भाजप नेते भेटलेत, आदेश राज यांचाच असणार - मनसे आमदार

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षातील कोणते आमदार गळाला लागतात याची चाचपणी सुरु झाली आहे. याचाच एकभाग म्हणून मनसेचा एकच आमदार निवडून आला. या आमदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. मात्र, आपण पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानणार आहोत. मी मनसेत राहणार असल्याचे मनसे आमदार शरद सोनावणे यांनी स्पष्ट केलेय.

Oct 21, 2014, 09:52 AM IST