basic needs

नोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत

काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.

Nov 15, 2016, 01:30 PM IST