५२ लाख

गिरगाव चौपाटी होणार ५२ लाखांच्या यंत्राने आता चकाचक

दक्षिण मुंबईला लाभलेला छान समुद्रकिनारा म्हणजे मुंबईची गिरगाव चौपाटी. परंतु नेहमीच समुद्रकिनाऱ्यावर फिरायला  जाणाऱ्या प्रत्येकाकडूनच तेथे असणाऱ्या कचऱ्याचा आणि तेथील घाणीचा तक्रार होताना दिसतो. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने रोज कचराकुंडी होत असलेली गिरगाव चौपाटी स्वच्छ करण्यासाठी ५२ लाख रुपयांचे यंत्र घेण्यात आले आहे.पालिकेच्या कंत्राटाचा हा भाग असल्याने त्याची त्यांना वेगळी किंमत मोजावी लागणार नाही. ह्या यंत्रामुळे गिरगाव चौपाटीचा सव्वा लाख चौरस मीटरचा किनारा अवघ्या चार तासात स्वच्छ केला जातो.

Dec 12, 2014, 08:01 PM IST

धोनी मॅच हरला भारतीयाने जिंकले ५२ लाख रूपये

भारतीय क्रिकेट टीमने गुरुवारी हॅमिल्टनमधील दुसरा वनडे सामना न्यूझीलंडबरोबर खेळताना गमावाला. हा भारताचा दुसरा पराभव. मात्र, धोनी सामना हरला तरी एका भारतीयाने चक्क ५२ लाख रूपये जिंकण्याची किमया केली आहे.

Jan 24, 2014, 11:55 AM IST