हार्दिक जोशी

पाहा राणादा-अंजलीच्या लग्नाची पत्रिका

येत्या ५ मार्चला राणादा-अंजली बाईंचा विवाहसोहळा पार पडतोय. या लग्नासाठी जोरदार तयारीही सुरु आहे. 

Mar 2, 2017, 01:16 PM IST

राणादा-अंजली बाईंच्या लग्नातील वरातीच्या धमाल गाण्याची झलक

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादादा-अंजलीबाई यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

Mar 2, 2017, 12:57 PM IST

हुरडा पार्टीत गायकवाड कुटुंबियांसह अंजलीचाही सहभाग

तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत आता हुरडा पार्टी रंगणार आहे. या पार्टीतच राणाला त्याच्या भावी जोडीदाराचा उलगडाही होणार आहे. या पार्टीत गायकवाड कुटुंबियांसह गावातील लोकही सहभागी होणार आहेत. तसेच या पार्टीसाठी अंजली बाईंनाही निमंत्रण देण्यात आलंय. 

Dec 23, 2016, 01:13 PM IST

रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा 'तुझ्यात जीव रंगला'

कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी... रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच... पण, या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी  झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे 'झी मराठी'च्या आगामी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून... येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Sep 27, 2016, 04:59 PM IST