नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांच्या पगाराबाबत 12 व्या स्थानावर
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील टॉप लिडरच्या यादीत समाविष्ठ झालेय. मात्र, पगाराच्याबाबतीत नरेंद्र मोदी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या खूप मागे आहेत. पे चेक इंडिया या नावाच्या वेबसाईटने जगातील प्रमुख नेत्यांचे पगार सांगितले आहेत.
Jun 11, 2014, 03:04 PM ISTभारतीय विद्यार्थ्यांना ५० लाख वेतनाची ऑफर
दुबईतील एका कंपनीने सहा भारतीय विद्यार्थ्यांना ४४.४४ लाख रूपयांचे वर्षाला पॅकेज देऊ केले आहे. या वेतनात कर समाविष्ट करून त्यांचे वेतन ५० लाख रूपयांपेक्षा अधिक असणार आहे.
Feb 28, 2014, 11:28 AM ISTनिवडणुकांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट
केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेंशनधारकांना लोकसभा निवडणुकांपूर्वी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून त्याला मूळ वेतनात सामील करण्याचा निर्णय होऊ शकतो.
Feb 21, 2014, 09:21 AM ISTकंपनीची उलाढाल १३ हजार कोटींची, पगार केवळ १ रूपया
कंपनीची उलाढाल १३ हजार कोटी रूपयांची. मात्र, एवढी मोठी उलाढाल असलेल्या या कंपनीचे सहसंस्थापक केवळ १ रूपयाच वेतन घेत आहे. तुम्हीही हैराण झालात ना. कोण आहे ती व्यक्ती? व्यक्ती आहे जगातील अग्रस्थानी असलेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायणमूर्ती.
Jan 14, 2014, 12:13 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!
यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...
Oct 20, 2013, 03:47 PM ISTआबा देणार आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळनिधीला
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळ निधीसाठी देऊन एक नवा पायंडा पाडलाय. ५७ हजार रुपयांचं वेतन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधीला दिलं आहे.
Feb 8, 2013, 05:36 PM ISTबीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!
मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.
Jan 2, 2013, 05:21 PM IST