विसर्जन

नागपुरात विसर्जनासाठी जयत्त तयारी

अनंत चतुर्दशीनिमित्त आज होणाऱ्या विसर्जनासाठी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जयत्त तयारी आहे. नागपूर महानगरपालिकेने विसर्जनाकरता १९८ कृत्रिम तलाव बांधले आहेत. या तलावांचा शोध घेणे सोपे जावे याकरता `moryaa' नावाचे अॅप देखील तयार केला आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पोलिसांमधील DJ च्या वापरावरून वाद सुरूच असून विसर्जनाच्या मिरवणुकीत देखील DJ च्या वापरावर निर्बंध असतील हे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Sep 5, 2017, 02:02 PM IST

गणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?

 ७ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेली कित्येक महिने भाविक गणेशोत्सवाची वाट पाहत होते.  हा उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर आज गौरी - गणपतीचा निरोप घेतला जाणार आहे. आपल्याला यथाशक्तीने बाप्पासाठी जे जे करता येईल ते  भाविक अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो. 

Aug 31, 2017, 04:17 PM IST