विधानसभा निवडणूक २०१४

मुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे

सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे. 

Sep 15, 2014, 05:11 PM IST

मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची तब्येत बिघडली

मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यामुळं काही काळासाठी या मुलाखती थांबवण्यात आल्या असून विश्रांतीसाठी राज ठाकरे हॉटेलवर गेले आहेत.

Sep 15, 2014, 04:42 PM IST

नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार

नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.

Sep 14, 2014, 09:25 PM IST

मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच निवडणूक लढतील?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार, याबाबत चर्चा रंगली असताना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच लढतील असे संकेत दिलेत. 

Sep 14, 2014, 08:51 PM IST

मुंबईत जागा वाढवा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत जास्त जागांची मागणी भाजपनं केली आहे. याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुजोरा दिला असून ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं शेलार म्हणाले.

May 21, 2014, 06:18 PM IST