www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत जास्त जागांची मागणी भाजपनं केली आहे. याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुजोरा दिला असून ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं शेलार म्हणाले.
मुंबईत मिळालेलं यश हे मोदी लाटेमुळे मिळालं असल्याचा दावा करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागा वाढवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील जागावाटपाचे सूत्र जसे लोकसभेला कायम राहिले तसे ते विधानसभेलाही कायम राहील, त्यात कोणताही बदल होणार नाही, असं दिल्लीत एका प्रश्नारच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात कोणीही काही वक्तव्य केली असली तरी आमची चर्चा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत होते. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात बदल होणार नाही.
शिवसेनेपुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा ही स्वाभाविक भावना आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळं आता मुंबईत भाजपचे कार्यकर्त्यांनी जागा वाढविण्याची मागणीवर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची काय भूमिका असते. यावरुन महायुतीत तर काही तणाव निर्माण होणार नाही ना? हे प्रश्न निर्माण होतायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.