राष्ट्रीय सव्यंसेवक संघ

विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारचे कान टोचले. शिक्षणातील व्यावसायिकता संपवून गरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे बजावले. तसेच विरोधकांसह शिवसेनेचे नाव न घेता कान टोकले. संघर्ष, संयम साधून विकासाला हातभार लावला पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, असे भागवत म्हणालेत.

Oct 22, 2015, 11:07 AM IST

दलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं, की रा.स्व.सं.च्या सरसंघचालकपदी विराजमान होऊ शकतो. कार्य करणारा कुठलाही स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. मात्र, केवळ दलित आहे, या आधारावर सरसंघचालक होऊ शकत नाही., त्याचं कार्यही तितकंच हवं.

Sep 5, 2012, 12:31 PM IST