माऊली... माऊली... माऊली...
ऋषी देसाई
युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. आषाढी कार्तिकीची वारी हा मराठी मनाचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि आनंदाच्या परमोच्च सोहळ्यात माऊलीचा ही आनंदवारी सुरु होते..