मंजुळा शेट्ये

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात आयुक्त पडसळगीकरांचं नाव काढण्यासाठी दबाव?

महिला कैदी मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातून दबाव आल्यानं मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांचं नाव याचिकाकर्त्यानं काढून टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. पडसलगीकर यांचं नाव काढण्याचा अर्ज याचिकाकर्त्यानं किला कोर्टात केला आहे.

Aug 21, 2017, 05:06 PM IST

शेट्ये हत्या प्रकरण : निलंबित अधिकारी अजूनही कामावर

भायखळा जेलमधील महिला कैदी मंजूला शेट्ये हिच्या हत्ये प्रकरणात आरोपी जेल अधिक्षक मनीषा पोखरकरसह सहा आरोपींना जेल पोलीस, मुंबई पोलीस, मुंबई क्राईम ब्रांच यांच्यानंतर आता सरकारदेखील पाठिशी घालतय का? असा आता प्रश्न निर्माण झालाय.

Aug 4, 2017, 08:30 PM IST

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी कोर्टानं सरकारला फटकारलं

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय.

Jul 31, 2017, 05:00 PM IST

'हत्येनंतर मंजुला शेट्येचं रक्त पुसून टाकलं गेलं'

'मंजुला शेट्येची हत्या केल्यानंतर मंजुलाचं रक्त पुसून टाकण्यात आलं. तसंच अत्याचार करण्यासाठी वापरण्यात आलेली काठी इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आली' असा धक्कादायक खुलासा एका कैद्यानं केलाय. 

Jul 14, 2017, 08:36 PM IST

...या व्हॉटसअप मॅसेजमुळे स्वाती साठे गोत्यात!

 मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात कारागृह उपपोलीस महानिरीक्षक स्वाती साठे या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंजूला शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करतायत. कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सप ग्रुपवर केलेल्या एका मेसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत येऊ शकतात. 

Jul 7, 2017, 09:21 PM IST

मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास स्वाती साठेंकडून काढून घेतला

भायखळा कारगृहात झालेल्या मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास कारगृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. यापुढे हे प्रकरण महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आलंय.

Jul 7, 2017, 03:51 PM IST

भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात सर्व ६ पोलिसांना अटक

भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात सर्व ६ पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यात जेल अधिक्षक मनिषा पोखरकर यांचाही समावेश आहे.

Jul 1, 2017, 10:27 PM IST

कैदी मंजुळा शेट्येची हत्या, गुन्हा दाखल होऊन एकालाही अटक नाही!

भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येची हत्या होऊन ४ दिवस उलटलेत. या प्रकरणी भायखळा जेलच्या अधिक्षक मनीषा पोखरकरसह एकूण ६ जणांवर ३०२ चा गुन्हा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. यामुळे मुंबई पोलीस निःपक्षपातीपणे तपास करताहेत का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 

Jun 27, 2017, 08:22 PM IST