बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. आज ते प्रसन्न मूडमध्ये होते. सकाळी त्यांनी पेपर वाचनही केलं.

Jul 26, 2012, 07:33 PM IST

बाळासाहेब 'लिलावती'मध्ये दाखल

[jwplayer mediaid="144957"]

Jul 24, 2012, 03:45 PM IST

राष्ट्रपती अफजल गुरुला फाशी द्या - ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं अभिनंदन केलंय.अभिनंदन करताना दहशतवादी अफजल गुरुचा अर्ज फेटाळून त्याला फासावर लटकावा आणि इतिहास घडवा, अशी मागणी बाळासाहेबांनी मुखर्जी यांच्याकडे केली.

Jul 23, 2012, 12:02 PM IST

‘बंधुत्व’ आणि ‘मित्रत्व’

प्रसाद घाणेकर

ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.

Jul 22, 2012, 04:39 PM IST

राज ठाकरे राहणार उद्धव ठाकरेंसोबत!

तब्येत सुधारेपर्यंत उद्धव सोबतच राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या अँजिओप्लास्टीच्या वेळी उद्धवसोबत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Jul 18, 2012, 09:40 PM IST

उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी?

शिवसेना कार्याध्य़क्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे. बायपास न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अँजिओप्लास्टीवेळी सर्व ठाकरे कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा आहे.

Jul 18, 2012, 09:12 PM IST

काय बोलले राज मातोश्रीतून बाहेर पडताना

काही लागलं तर फोन करा... सांभाळून राहा, असे राज ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडताना आपला मोठा भाऊ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jul 16, 2012, 09:01 PM IST

राज-उद्धव यांची शेवटची भेट २००८ साली

आज राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंची भेट तब्बल साडेतीन वर्षांनी झाली. यापूर्वी २००८ साली राज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

Jul 16, 2012, 06:42 PM IST

राज बनले 'सारथी' उद्धवांना सोडले 'मातोश्री'वरती

गेल्या काही वर्षांपासून राजकीय बंधनांमध्ये अडकलेल्या ठाकरे बंधूंनी सर्व बंधने झुगारून रक्ताच्या नात्यांना जवळ करत एकाच दिवशी एक नाही दोन वेळा भेट घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले.

Jul 16, 2012, 06:27 PM IST

राज ठाकरे बाळासाहेबांना भेटायला 'मातोश्री'वर

आजाराच्या निमित्ताने का होईना, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.

Jul 16, 2012, 06:13 PM IST

पवार... 'दी पॉवर गेम'

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींनी काल मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानले. प्रणवदांच्या या भेटीमुळे भाजपमधील अस्वस्थता वाढलीए. पण दुसरीकडे शरद पवारांनीही ही भेट घडवून शिवसेनेशी आपली मैत्री अधिक घट्ट केलीए.

Jul 14, 2012, 09:08 AM IST

आक्रमक व्हा, नाहीतर राजीनामा द्या- बाळासाहेब

शिवसेनाप्रमुखांकडून सेना आमदारांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. बाळासाहेब आमदारांच्या कामगिरीवर नाराज झाले आहेत. 'शिवसेना आमदारांनो 'आक्रमक होता येत नसेल तर राजीनामा द्या' अशा शब्दात बाळासाहेबांनी आमदारांना झो़डपून काढलं.

Jul 13, 2012, 06:30 PM IST

मुखर्जी-पवार घेणार शिवसेनाप्रमुखांची भेट

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे.

Jul 13, 2012, 08:52 AM IST

सीमावासियांच्या पाठिशी शिवसेना - ठाकरे

आज बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. सुमारे तासभर त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शेवटपर्यंत सीमावासियांच्या पाठिशी राहिली असं आश्वासन बाळासाहेबांनी सामीवासियांना दिलं.

Jul 8, 2012, 06:05 PM IST

'मिसाइल मॅन'वर शिवसेनाप्रमुखांचं मिसाइल

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘टर्निंग पॉइंट’ या आत्मचरित्रात सोनिया गांधींबाबत केलेल्या खुलाशावरून वाद वाढतोच आहे. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही कलमांवर त्यांच्या खुलावावरून टीकास्त्र सोडलंय.

Jul 2, 2012, 02:48 PM IST