भाजपवर आरोप करणाऱ्या आमदार अनिल गोटे यांनी चार बोटे आपल्याकडे असतात हे विसरू नये, असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार गोटेंना लगावला.
गुजरात आणि जळगाव येथे निवडणुकीसाठी वापरलेली मतदान यंत्र धुळे महापालिका निवडणुकीत नको. ही मतदान यंत्रे बदलण्यात यावीत तसेच व्हीपीटी मशीनचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आलेय.
भाजपविरोधात बंडखोरी करणारे आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत लोकसंग्राम पक्षाच्या नेतृत्वात स्वतःचे ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षावर गंभीर आरोप केलेत. केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरेंसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांना धुळे जिल्हाबंदी करा, अशी मागणी केली आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.