दहशतवादी एन्काऊंटर

भोपाळ दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणात नवा खुलासा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जेलमधून दहशतवादी फरार झाले आणि काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांना ठार केलं. या ऐन्काऊंटरनंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. अनेक वेगवेगळे खुलासे यानंतर होत राहिले. यामध्ये आता एक नवा खुलासा झाला आहे की, सिमीच्या या दहशतवाद्यांची साक्ष आणि सुनावणी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे होतं होती. त्यांना कोर्टात नेलं जात नव्हतं. या दरम्यान ते पसार होण्याचा प्रयत्न करु शकतात अशी शंका पोलिसांना होती.

Nov 2, 2016, 09:43 AM IST

दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणावर मानवाधिकार आयोगाने मागितलं उत्तर

मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने सिमीच्या दहशतवाद्यांच्या एनकाउंटरवर शिवराज सरकार आणि पोलिसांकडे उत्तर मागितलं आहे. मानवाधिकार आयोगाने १५ दिवसात या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे.

Nov 1, 2016, 09:32 AM IST