डॉक्टर संप

निवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल

डॉक्टरांचा संपाचा चौथा दिवस आहे. रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. खासगी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. 

Mar 23, 2017, 10:25 AM IST

डॉक्टरांचा संप; उपचाराअभावी स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू

उपचाराअभावी आज सकाळीच स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूची भयानक साथ पसरलीय. तरीही नाशिकमधल्या  खासगी डॉक्टर्सनी संप केलाय.

Mar 23, 2017, 10:18 AM IST

राज्यातील 40 हजार डॉक्टर संपावर

राज्यातील 40 हजार डॉक्टर संपावर, रुग्ण सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. डॉक्टरांना मारहाण झाल्याचा निषेध म्हणून डॉक्टर चौथ्या दिवशी संपावर आहेत. कारवाई करण्याची ठोस मागणी त्यांनी लावून धरली आहे.

Mar 23, 2017, 08:13 AM IST

डॉक्टर संपाचे 80 बळी?, मृत्यूबाबत अहवाल द्या - हायकोर्ट

नुकत्याच झालेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिका-यांच्या संपात किती रूग्णांचे मृत्यू झाले, कितीजण उपचारांपासून वंचित राहीले याचा अहवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे मागवला आहे. दोन आठवड्यात हा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Jul 10, 2014, 09:36 AM IST

डॉक्टरांच्या संपाचा राज्यात पहिला बळी

डॉक्टरांच्या संपाचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये गेलाय. रावेरच्या सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिपाई कल्पेश महाजन विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला हजर नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाच्या दिशेन जोरदार दगडफेक केली तसेच साहित्याची तोडफोड केलीय. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरूच होता. यामुळे रावेर मधील वातावरण तणावपूर्ण झालं होत. या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 3, 2014, 08:15 PM IST