मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल
प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे
Feb 26, 2022, 09:44 PM ISTआठवणी कुसुमाग्रजांच्या...
रामदास भटकळ
मी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रकाशन व्यवसायात पदार्पण केलं. त्यानंतर आजमितीला साठ वर्षाहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. मी सुरवात केली तेव्हाच कवी कुसुमाग्रज विशाखा काव्यसंग्रहामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ होते. विशाखाच्या वलयामुळे कुसुमाग्रजांची प्रतिमा समाजमनात एक सुपरमॅन अशीच होती. मला स्वत:ला दहावीत असताना त्यांची कविता अभ्यासाला होती.