एनडीए नेते

PHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?

एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी  संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले. 

Jun 7, 2024, 01:44 PM IST

मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!

 लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.

Jun 7, 2024, 12:32 PM IST