एकमराठालाखमराठा

मराठा क्रांती मोर्चा@मुंबई

मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत ( ९ ऑगस्ट २०१७) काढण्यात आला. यावेळी झालेली गर्दी

Aug 9, 2017, 12:33 PM IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान

मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे

Aug 9, 2017, 12:06 PM IST

मराठा क्रांती मोर्चा मुंबई: काय आहे कोपर्डी प्रकरण? माहिती आणि घटनाक्रम

कोपर्डी हे एक अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. या गावात एका निष्पाप चिमूरडीवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला. बलात्कार करून या नराधमांच्या मनातील राक्षस थांबला नाही तर, त्यांनी त्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली.

Aug 9, 2017, 11:31 AM IST

मुंबईतील वातावरण झालं 'मराठा'मय

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रणशिंग थोड्याच वेळात मुंबईत धडकणार आहे. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चेकरी मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय झाला आहे. सांगली, सातारा, सोलापूर येथून मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हातात भगवे झेंडे घेत उपनगरांमधून देखील मराठा तरुण मुंबईत दाखल होतो आहे.

Aug 9, 2017, 11:08 AM IST

सोशल मीडियावर मोर्चाची धूम, मराठा क्रांती मोर्चा ट्विटरवरही ट्रेंडींग

मराठा क्रांती मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत गर्दीचा उच्चांक नोंदविला जाण्याची शक्यता आहे. कालपासून मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येत आहे. हा विक्रमी मोर्चा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना सोशल मीडियावरही मराठा मोर्चाचा ट्रेंड दिसत आहे.

Aug 9, 2017, 11:03 AM IST

मराठा मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

मराठा मोर्चाला अर्धा तास उरला असताना प्रचंड गर्दी वाढत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून अनेक लोक मुंबईत दाखल झालेत. तर कर्नाटकातूनही अनेक जण आलेत. दरम्यान, या मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेने आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Aug 9, 2017, 10:53 AM IST

मराठा क्रांती मोर्चा मुंबई : आतापर्यंतच्या १० ठळक घडामोडी

मोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व हायवेवरील टोल बंद करण्यात आला आहे.

Aug 9, 2017, 10:18 AM IST

मराठा मोर्चा : मुंबईला छावणीचे स्वरुप, आज मुंबई थांबणार

कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठ्यांचे वादळ काही वेळातच राजधानी मुंबईत धडकणार आहे. मोर्चासाठी राज्याचा कानाकोपऱ्यातून मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. रात्रीपासूनच मुंबईत मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मोर्चाचा परिणाम सुरू झाला असून, अनेक मार्गावरील वाहतूक संथ झाली आहे. 

Aug 9, 2017, 09:57 AM IST

मराठा मोर्चाला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याची शक्यता

मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबाईतील मराठा मोर्चा ला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याचा आयोजकांना विश्वास आहे. मुंबईत 500 शाळांना सुटी तर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. 

Aug 9, 2017, 08:59 AM IST