...आणि ‘आप’चे मंत्री विधानसभेत पोहोचले रिक्षानं
दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्वच नवनियुक्त आमदार विधानसभेत पोहचले. कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर न करण्याचा निर्धार आपच्या आमदारांनी केलाय.
Jan 1, 2014, 06:58 PM ISTदिल्लीत काहीही घडू शकतं - केजरीवाल
दिल्लीमध्ये ‘आप’नं सत्ता स्थापन केली असली तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ मात्र अद्याप त्यांना सिद्ध करायचंय. या दरम्यान खूप काही घडू शकतं, असं दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटतंय.
Jan 1, 2014, 01:36 PM ISTकेजरीवालांनी पूर्ण केलं दुसरं आश्वासन, वीज दर ५०% कमी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पुर्तता करण्याचा धडाका लावलाय. मोफत पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर केजरीवालांनी आता स्वस्त वीज पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.
Dec 31, 2013, 07:46 PM ISTकाँग्रेस-भाजपचं षडयंत्र, आमच्याकडे ४८ तास - केजरीवाल
आम आदमी पक्षाचं सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप मिळून षडयंत्र रचत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. आमच्याकडे आता ४८ तास असून यामध्ये आम्ही जनतेची जास्तीत जास्त सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Dec 31, 2013, 04:02 PM ISTदिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.
Dec 30, 2013, 06:16 PM ISTमहाराष्ट्राला ‘आप’लं करण्यासाठी केजरीवालांची सेना सज्ज!
अरविंद केजरावाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आपच्या घोडदौ़डीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आपची कार्यालयं उघडत आहेत. यांचा प्रयत्न एकच, दिल्लीप्रमाणं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणं.
Dec 29, 2013, 09:03 PM IST`अॅपल` सोडून लाल बहादूर शास्त्रींचा नातू `आप`मध्ये!
लाल बहादूर शास्त्री यांचा नातू आदर्श शास्त्री यांनी शुक्रवारी ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केलाय. महत्त्वाचं म्हणजे, आदर्श शास्त्री यांनी ‘अॅपल’ या कंपनीतील भरघोस पगाराच्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 29, 2013, 02:48 PM ISTअण्णांना आहे अरविंद केजरीवालांवर विश्वास!
दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.
Dec 28, 2013, 07:14 PM IST‘आप’ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कामकाजाला सुरुवात!
नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...
Dec 28, 2013, 05:16 PM ISTमंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.
Dec 24, 2013, 08:22 PM IST<B> केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं जाहीर... </b>
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय.
Dec 24, 2013, 07:49 PM IST`आप`ला समर्थन देण्यावरून काँग्रेसमध्ये फूट - द्विवेदी
दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’ला काँग्रेसकडून दिल्या गेलेल्या पाठिंब्यावर आता पक्षातच फूट पडताना दिसतेय.
Dec 24, 2013, 06:39 PM ISTदिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्री
दिल्लीत आता आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचं ‘आप’नं स्पष्ट केलंय. आज आम आदमी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांनी आपण आज नायब राज्यपालांना भेटायला जाणार असून सत्ता स्थापनेसाठी पत्र देणार आहे.
Dec 23, 2013, 12:09 PM ISTदिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा
दिल्लीमध्ये सरकार स्थापनेकडे आम आदमी पार्टी आता कूच करतेय... अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे… आम आदमी पक्षाच्या जनमत चाचणीत दिल्लीकरांनी हा कौल दिलाय.
Dec 23, 2013, 08:28 AM ISTकेजरीवाल नाही तर मनिष सिसोदिया बनणार मुख्यमंत्री?
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत. पण, भारताच्या राजधानीच्या शहरात मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याचा अंतिम निर्णय त्यांनी आपल्या आमदारांवर सोडलाय.
Dec 22, 2013, 06:27 PM IST